Breaking news

दहिवली येथे काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

कार्ला : दहिवली येथे सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी हभप तुषार महाराज दळवी यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. दुपारी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या काठीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. सप्ताह काळात दररोज पहाटे काकडा, सायंकाळी हरिपाठ, प्रवचन, संध्याकाळी कीर्तन, महाप्रसाद, हरिजागर केला जात होता.

        तीन दिवस सप्ताह काळात हभप कु. बाल प्रवचनकार स्वरालीताई इंगवले, हभप अंनता महाराज शिंदे, हभप सागर महाराज पडवळ  यांचे प्रवचन झाले. तर हभप शंकरानंद जी  महाराज, हभप पोपट महाराज कासार खेडकर, हभप सुनील महाराज गाडेकर यांचे कीर्तन झाले. तर तुषारमहाराज दळवी यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. 

      सप्ताहाच्या काळात आलेल्या वारकर्‍यांसाठी व भाविकांसाठी दानशूर व्यक्ती व  दहिवली ग्रामस्थां यांच्या वतीने दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताहचे संयोजन विठ्ठल रुख्मिणी भजनी  मंडळ समस्थ ग्रामस्थ दहिवली, महिला बचत गट दहिवली यांनी केले होते. यावेळी वेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

इतर बातम्या

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; यंदाचा कलागौरव पुरस्कार अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेते प्रसाद खांडेकर यांना जाहीर