महत्वाची बातमी l राकसवाडीमध्ये वन्यप्राण्यांसाठी पानवट्यांत पाणी सोडण्याची कार्यवाही – वनविभागाचे उल्लेखनीय पाऊल

मावळ माझा न्युज नेटवर्क : शिरोता वनपरिक्षेत्रांतर्गत उकसान वनपरिमंडळातील राकसवाडी येथील पानवट्यांमध्ये आज वन्यप्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांना पाण्याची टंचाई भासू नये म्हणून ही महत्त्वपूर्ण कार्यवाही करण्यात आली.
या उपक्रमावेळी शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सोमनाथ ताकवले, वनपरिमंडळ अधिकारी एम. बी. घुगे, श्री. जी. ए. भोसले, डी. डी. उबाळे, एस. बी. साबळे तसेच वनमजूर श्री. घुले यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सध्या नाने मावळ क्षेत्रात एकूण 9 पानवट्या तर अंदर मावळ भागात 27 पानवट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे पाऊल वन्यजीव संवर्धनासाठी उपयुक्त ठरत असून, मावळ तालुक्यातील नागरिक आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने वनविभागाच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे.