मावळातील भरत भोते यांची महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

लोणावळा : मावळ तालुक्यातील परंदवडी या ठिकाणी राहणारे भरत बाळू भोते यांची महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी (मावळ व खेड विधानसभा) नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाचे सरचिटणीस सूर्यकांत तांडेल यांनी सदरचे नियुक्तीपत्र दिले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष उदय दळवी, प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत तांडेल, चिटणीस अशोक टाव्हरे, पुणे जिल्हा लोकसभा अध्यक्ष युवराज दळवी, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय घुले यांच्या मार्गदर्शनाखाली भरत भोते यांची पुणे जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) व वैभव विक्रम छाजेड यांची महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष (पुणे शहरी) पदी नेमणूक करण्यात आली आहे. या नियुक्तीच्या वेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सरचिटणीस सूर्यकांत तांडेल अशोक टाव्हरे, दत्तात्रय घुले, सतीश गरुड, सचीन ढोरे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष कृष्णा कनगुडे आदी उपस्थित होते.