Breaking news

Maval Big News l मावळातील 103 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ तालुक्यामधील 103 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज 23 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स या ठिकाणी जाहीर करण्यात आली. पुढील पाच वर्षांमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ही सोडत जाहीर करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीवर या आरक्षण सोडती नंतर महिलाराज येणार आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ज्या ग्रामपंचायती विविध प्रवर्गांसाठी राखीव झाले आहेत त्या ठिकाणी इच्छुकांकडून खंत तर ज्या ग्रामपंचायत सर्वसाधारण जागेसाठी निश्चित झाले आहेत त्या ठिकाणी आनंद उत्सव व्यक्त केला जात आहे. 

      मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, विविध ठिकाणचे मंडल अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. 5 मार्च 2025 ते 04 मार्च 2030 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी ही आरक्षण सोडत लागू असणार आहे. मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमातीसाठी कायमस्वरूपी राखीव आहेत. त्यांचा या सोडतीमध्ये समावेश नव्हता उर्वरित 93 ग्रामपंचायती पैकी 9 ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी, 6 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी, 25 ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर 53 ग्रामपंचायती या सर्वसाधारण वर्गासाठी असणार आहेत. 

 आरक्षण सोडत खालील प्रमाणे - 

अनुसूचित जमातीसाठी स्त्री राखीव - कुसवली, उधेवाडी, खांड, कशाळ, इंगळून

अनुसूचित जमाती - शिरदे, कुनेनामा, सावळा, वडेशवर, मालेगाव बु.

ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी- (स्री राखीव 5) - तुंग, कान्हे, ओवळे, शिळीम, शिवणे

(अनुसूचित जातीसाठी 4) आंबी, कुजगाव पमा, नाणे, आढले बुद्रुक.

अनुसूचित जमातीसाठी 6 ग्रामपंचायती यापैकी (स्त्री राखीव 3) - करूंज, जांभूळ, जांबवडे.

(अनुसूचित जमातीसाठी 3) डोंगरगाव, मळवंडी ठुले, देवले.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) 25 ग्रामपंचायती - यापैकी (स्त्री राखीव 13) - सोमाटणे, कुरवंडे, सांगवडे, खडकाळा, मोरवे, शिरगाव, वारू, वरसोली, पुसाणे, औंढे खुर्द, बऊर, खांडशी, पाटण. 

(नागरिकांचा मागास प्रवर्ग 12 ग्रामपंचायती) - नामाप्र-शिळाटणे, करंजगाव, कांब्रे (नामा), मळवली, यलघोल, सांगीसे, वराळे, दारुंब्रे, पाचाणे, भाजे, धामणे, मळवंडी ढोरे.

53 ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी यापैकी (सर्वसाधारण स्त्री राखीव 27) - सुदुंबरे, साळुंब्रे, सुदवडी, दिवड, चिखलसे, गहुंजे, कल्हाट, साते, आढले खुर्द, डाहुली, इंदोरी, निगडे, टाकवे बुद्रुक, थुगाव, शिवली, गोवित्री, उर्से, कुसगाव खुर्द, महागाव, घोणशेत, कोथुर्णे 

(सर्वसाधारण 26) - आजीवली, ठाकूरसाई, कडदे, लोहगड, आंबळे, नवलाख उंबरे, वेहेरगाव, ताजे, कार्ला, तिकोना, साई, आढे, परंदवडी, कुसगाव बुद्रुक, आपटी, उकसान, चांदखेड, भोयरे, गोडुंब्रे, येळसे, बेबडओहळ, कोंडीवडे (आ मा), माळवाडी, वाकसई, मुंढावरे आंबेगाव.

इतर बातम्या

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; यंदाचा कलागौरव पुरस्कार अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेते प्रसाद खांडेकर यांना जाहीर