Sci-Tech Villagethon 2026 मध्ये SIT लोणावळ्याच्या NSS स्वयंसेवकांची उल्लेखनीय कामगिरी
लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या स्वयंसेवकांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पकतेचा, तांत्रिक कौशल्याचा आणि संघभावनेचा प्रभावी आविष्कार घडवत पुणे येथील AISSMS College of Engineering येथे आयोजित ‘Sci-Tech Villagethon 2026’ या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
‘21st AISSMS Engineering Today 2026’ अंतर्गत 29 व 30 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित या स्पर्धेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विविध समस्या ओळखून त्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण, व्यवहार्य आणि शाश्वत उपाय विकसित करणे हा होता. या स्पर्धेत SIT लोणावळ्याच्या NSS युनिटमधील विद्यार्थ्यांनी ‘Rapid Rustics’ या संघाच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनेचे प्रभावी सादरीकरण करत तांत्रिक ज्ञान, कल्पकता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि संघकार्य यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्या या उल्लेखनीय प्रयत्नांची दखल घेत ‘Rapid Rustics’ संघाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या यशस्वी संघात अनिश जाधव, मैत्रयी सुतार, प्राची कुमारी, समृद्धी थोम्बरे, अनिकेत जाधव आणि आदित्य सूर्यवंशी या NSS स्वयंसेवकांचा समावेश होता.
NSSच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासतानाच तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी उपयोग करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता या कामगिरीतून अधोरेखित झाली. त्यांच्या या यशाबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा चे प्राचार्य डॉ डी एस मंत्री, उपप्राचार्य डॉ एस एम गायकवाड, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि NSS युनिटच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना तसेच NSSच्या सामाजिक व तांत्रिक दृष्टिकोनाला निश्चितच नवी ओळख मिळाली आहे.
















