आनंदवार्ता l डोंगरगाववाडी, लोणावळा येथील मृण्मयी गणेश काळे हीला राजयुवा उत्कृष्ट बालकवीयत्री पुरस्कार 2024 जाहीर

लोणावळा : डोंगरगाववाडी, लोणावळा येथील मृण्मयी गणेश काळे हीला राजयुवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व रजयुवा प्रकाशन पुणे यांच्या वतीने राजयुवा उत्कृष्ट बाल कवीयत्री पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे.
राजयुवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व राजयुवा प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 17 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त "शब्द पंढरीचे आम्ही वारकरी" या कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये काव्य गौरव पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, युवा उद्योजक पुरस्कार, अशा विविध पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगरगाववाडी येथील मृण्मयी गणेश काळे इयत्ता सहावी हिला तिच्या साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 'राज युवा उत्कृष्ट बालकवीयत्री पुरस्कार' देण्यात येणार आहे.
साहित्यिक क्षेत्रातील दखल घेऊन निवड समितीने तिला पुरस्कार जाहीर केल्याची माहिती संयोजक राजीव प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गौरव पुंडे आणि उपाध्यक्ष योगेश हरणे यांनी दिली.
आषाढी एकादशी म्हणजेच बुधवार 17 जुलै 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का चौक पुणे स्टेशन याठिकाणी 11 ते 3 या वेळेत हा पुरस्कार वितरण सोहळा व कवी संमेलन होणार आहे. उत्कृष्ट बालकवी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नातेवाईकांकडून तसेच शाळेतील शिक्षकांकडून मृण्मयीचे कौतुक केले जात आहे. याचे सर्व श्रेय तिने आई-बाबांना दिले आहे.