Breaking news

Lonavala News : RSS लोणावळा उपखंडाचा विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव संपूर्ण गणवेशात संपन्न

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

लोणावळा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) लोणावळा उपखंड विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव संपूर्ण गणवेशात रविवारी लोणावळा नगरपरिषद शाळा क्र. 1 येथे संपन्न झाला. नियुध्द, दंडयुद्ध, यष्टि, सूर्यनमस्कार, घोष अशी विविध प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. उत्सवाला लोणावळा तालुका संघचालक अजितदादा घमंडे, उत्सव प्रमुख वक्ते चंदुभाऊ पांडुरंग पाठक - (पश्चिम महाराष्ट्र प्रांत मुख्य मार्ग) आणि प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमारजी सिंघल (Director and joint Secretary, Agrasen Global Foundation) हे उपस्थित होते.

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून दुर्बल आणि असंघटित झालेल्या हिंदू समाजाला संघटना सूत्रात गुंफण्याचे महत्वकार्य सुरू केले. आज संघाचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. शिस्तबध्द संघटनेच्या शक्तीचे दर्शन समाजाला घडावे म्हणून दरवर्षी शस्त्रपूजन उत्सव घेतला जातो. ह्यावर्षी लोणावळा उपखंडाचा विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव संपूर्ण गणवेशात संपन्न झाला.

इतर बातम्या