Breaking news

Lonavala Heavy Vehicle Ban l जड अवजड वाहनांच्या प्रवेश बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात

लोणावळा : लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर जड अवजड वाहनांच्या प्रवेश बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी वलवण गावाच्या हद्दीत पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. खंडाळा महामार्ग पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी या ठिकाणी मागील दोन दिवसापासून उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही यंत्रणा कायम स्वरुपी तैनात ठेवावी अशी अपेक्षा लोणावळाकर नागरिक व्यक्त करत आहेत.

मावळ माझा न्युज चा वाॅटस्अप ग्रुप जॉईन करा

     लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी व अपघाताची समस्या सोडवण्यासाठी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी याबाबत 14 जून 2024 रोजी अधिसूचना काढलेली असताना देखील त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचे बाब मागील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी महामार्ग पोलिसांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत ताकीद दिली होती. लोणावळा शहर पोलीस, महामार्ग पोलीस यांनी लोणावळा शहरातून जड अवजड वाहने जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. लोणावळा पोलीस लोणावळ्यात येणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई देखील करत आहेत. 

     या आदेशाची माहिती वाहन चालकांना व्हावी याकरिता वरसोली टोल नाक्यापासून वलवण गावापर्यंत काही अंतरावर चार ते पाच ठिकाणी मोठे फलक लावणे गरजेचे आहे. रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनी यांनी याकरिता यंत्रणेला मदत करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या