Breaking news

Lonavala News | आपल्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करा - विक्रांत पाटील

लोणावळा : गाव चलो अभियान अंतर्गत आज लोणावळा शहरातील तुंगार्ली येथे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस विक्रांत दादा पाटील व मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांनी तुंगार्ली येथील नागरिकांच्या घरोघरी भेटी देऊन त्यांना मोदी सरकार व महायुती सरकारने केलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देऊन पत्रके वाटप केली. आपल्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी येणाऱ्या काळात आपण सर्वांनी मोदी साहेबांच्या मागे उभे राहून त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करावे असे मत याप्रसंगी विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले. 

      तसेच यावेळी जेष्ठ संघसेवक जोशी काका व भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ कार्यकर्त्या भालेराव आजी यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या तब्बेतीची विचारणा करून त्याचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी लोणावळा भाजपा शहराध्यक्ष अरुण लाड, सरचिटणीस शुभम मानकामे, कार्याध्यक्ष सुधीर पारीठे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाळेकर, माजी नगरसेविका गौरी मावकर, गणेश मावकर, हरीलाल बोरकर, विजय इंगुळकर, संतोष जंगले, श्रवण चिकने, संकेत निकुडे, सिद्धेश अंभोरे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व बूथ कमिटी सदस्य उपस्थित होते.

इतर बातम्या