Breaking news

लोणावळा शहरात रविवारी 24 तासात 77 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरात रविवारी 24 तासात 77 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून लोणावळा शहरात पावसाचा जोर वाढला आहे. ऐन गणेशोत्सवात पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांचे व भाविकांचे मोठे हाल झाले आहेत.  

     बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. आज सोमवारी घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच मावळातील पवना धरण भरल्याने या धरणातून 3450 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पवना नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा देण्यात आला आहे.

    लोणावळा शहरात यावर्षी आजपर्यंत 4187 मिमी (164.84 इंच) पावसाची नोंद झाली आहे.

इतर बातम्या