Breaking news

Lonavala Tourist Point : सहारा पुल धबधबा पर्यटकांनी बहरला

लोणावळा : मागील दोन तीन दिवसांपासून लोणावळ्यात कमी अधिक प्रमाणात का होईना पण पावसाला सुरुवात झाल्याने सहारा पुलासमोरील डोंगरावरून वाहणांच्या धबधब्याला पाणी आले असून या धबधब्याखाली भिंजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. जुन महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शहरातील धरणे व धबधबे पाण्याच्या प्रतिक्षेत होते. भुशी धरण भरण्यास अद्याप वेळ असला तरी सहारा पुलासमोरील डोंगरातून वाहणार्‍या धबधब्यांना पाणी आले आहे. धबधब्यांखाली भिजत असताना, पावसाच्या पडणार्‍या हलक्या सरी, डोंगरांवरून वाहणारे धुके व वारा याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळ्यात आले आहे. चारचाकी, दुचाकी वाहनांसह रेल्वे येऊन पायी धरण व धबधबे या दिशेने जाणारे पर्यटक यांच्या रांगा आज पहायला मिळाल्या. भुशी धरणात अद्याप पाणी कमी असले तरी धरणावर पर्यटकांनी गर्दी केली होती. लायन्स पाॅईटचा परिसर देखील पर्यटकांनी गजबजला होता. या भागात पावसाच्या सोबत दाट धुके देखील होते. 

इतर बातम्या