Breaking news

Lonavala Rasta Roko : टॅक्सी चालक मालक, टपरी धारक व माळी कामगारांच्या समर्थनार्थ आमदारांचा सव्वा दोन तास रास्ता रोको

काय म्हणाले आमदार सुनिल शेळके व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

लोणावळा : टॅक्सी चालक मालक, टपरी धारक व माळी कामगार यांच्या समर्थनार्थ व स्थानिक नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या विरोधात आज मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी लोणावळ्यात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग तब्बल सव्वा दोन तास रोखला होता. लोणावळा शहरात अतिक्रमणाच्या नावाखाली स्थानिकांवर कारवाई करणार्‍या प्रशासनाने ज्यांची अनाधिकृत बांधकामे व शेड आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करावी. कायदा सर्वांना समान असताना श्रीमंतांना एक न्याय व गरिबांना एक न्याय ही भुमिका चालू देणार नाही. कोर्ट कमिटी देखील कायद्याच्या अधिन राहून काम करत असले तर ते अनाधिकृत बांधकामांवर कारवाई का करत नाही केवळ गोरगरीबांना का वेठीस धरले जात आहे असा प्रश्न आमदार शेळके यांनी उपस्थित केला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

काय म्हणाले आमदार सुनिल शेळके व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

    ओला उबेर या भांडवालदार कंपन्यांच्या वाहनांमुळे स्थानिक टॅक्सी चालक मालकांचा व्यावसाय ठप्प झाला आहे. पुढील पंधरा दिवसात यावर ठोस निर्णय घेऊ असे सांगताना आमदार शेळके म्हणाले, आमचा ओला उबेरला विरोध आहे. त्यांनी मुंबई पुणे अथवा कोठूनही लोणावळ्यात भाडे घेऊन आल्यानंतर त्यांना हाॅटेल, बंगले अथवा जिथपर्यंत बुकिंग आहे. तेथे सोडून परत जावे, पर्यटकांना पर्यटनस्थळांवर घेऊन जाण्याचे काम स्थानिक व्यावसायकांनी करावे, ही आमची भुमिका आहे. याकरिता लोकल अँप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. तसेच सर्वसमावेशक दर निश्चिती करण्यात आली असून पर्यटक असो व स्थानिक कोणावरही अन्याय होणार नाही व जादा दर देखील आकारले जाणार नाही याची खबरदारी घेत सर्वत्र दरपत्रक लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

     माळी कामगारांविषयी बोलताना आमदार म्हणाले लोणावळा खंडाळा भागातील बंगल्यांवर माळीकाम करणारे नागरिक वर्षानुवर्ष काम करत आहे. काही जणांच्या दोन दोन पिढ्या येथे काम करत आहे. यानंतर बंगला सोडताना अथवा विकताना माळी कामगार व बंगला अथवा प्लाॅटधारक यांच्यात साधक बाधक चर्चा होऊन तडजोड होत होती. आतामात्र यामध्ये पोलिसांचा हस्तक्षेप वाढला असून ही तडजोड पोलीस करत आहेत. पोलीस अधिकारी गोरगरिबांना शिविगाळ करतात, मारहाण करतात हे प्रकार चालू देणार नाही. भ्रष्टाचारी पोलीस आम्हाला नको, त्यांच्या बदलीची मागणी लावून धरणार असल्याचे सांगितले. 

    टॅक्सी चालकाला शिविगाळ व मारहाण करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला रजेवर पाठवत त्यांची चौकशी करण्याचे आश्वासन लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिल्यानंतर सदरचा रास्ता रोको मागे घेण्यात आला. 

काय म्हणाले आमदार सुनिल शेळके व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

इतर बातम्या