Breaking news

Lonavala News : बंगालवरून लोणावळ्यात 18 हजार रुपये गुगल पे ने ट्रान्सफर झाले मात्र पैसे पाठविणारा सापडला रायगड जिल्ह्यातील चावणी गावात

लोणावळा : बंगालवरून लोणावळ्यातील एका तरुणाच्या दुकानातील गुगल पे खात्यावर 18 हजार रुपये ट्रान्सफर झाले. दुकानात कोणीही गिर्‍हाईक नाही व कोणाकडून पैसे देखील येणे नाही मंग पैसे पाठविले कोणी असा विचार तो करत असताना, पैसे ट्रान्सफर करणार्‍या त्या व्यक्तीचा फोन आला की माझे पैसे परत पाठवा मी बंगाल वरून बोलत आहे. मात्र माझा नंबर व क्यु आर कोड तुला कसा मिळाले ते सांग मंग पैसे पाठवतो असे सदर युवकाने सांगितले असता, त्याने योग्य माहिती दिली नाही. हा सर्व ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार असावा याकरिता खंडाळा बॅटरीहील येथे राहणारा तरुण सचिन किसन तिकोणे याने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. याचवेळी श्रीकांत घोष नावाच्या त्या पैसे पाठविणार्‍या युवकाचा फोन आला. मात्र आता तो मी नागपुर मधून बोलत आहे असे सांगत होता. कधी बंगाल तर कधी नागपुर असे तो सांगत असल्याने त्याला पोलिसांनी सांगितले तुला पैसे पाहिजे असतील तर तू लोणावळा शहर पोलीस ठाण्यात ये व रोख पैसे घेऊन जा असे सांगितले. मात्र आता प्रश्न हा होता की गुगल पे चा एखादा नंबर चुकला तर पैसे चुकिच्या व्यक्तीला जाऊ शकतात पण QR code समोरील व्यक्तीला कसा मिळाला व सचिन यांचा नंबर श्रीकांतकडे कसा आला. ही सर्व शहानिशा सचिन व लोणावळा पोलिसांनी केली तर श्रीकांत हा बंगाल किंवा नागपुरला नसून रायगड जिल्ह्यामधील चावणी गावात काम करत आहे अशी माहिती समोर आली. चावणी गावचे पोलीस पाटिल समीर पाटील हे श्रीकांत घोष याला घेऊन आज बुधवारी लोणावळा पोलीस स्टेशनला हजर झाले. लोणावळा पोलीसांनी श्रीकांत यांची खरी ओळख पटवून त्याच्या मोबाईल मधून झालेल्या व्यवहाराची माहिती तपासली. नंतर सचिन तिकोणे यांनी लोणावळा पोलीस विजय बारकु मुंढे यांच्या समोर श्रीकांत घोष याला रोख रु 18 हजार परत केले. व माणुसकीचे उदाहरण देत असताना आपण एक जागरुक नागरिक असल्याचे कर्तव्य पाडले. चुकीचा नंबर टाकला गेल्याने पैसे इतर कोणाच्या खात्यावर गेले तर किमान खरे बोलून झालेला प्रकार समोरच्या व्यक्तीला प्रामाणिकपणे सांगण्याची सबक देखील श्रीकांत ला मिळाली. पहिल्याच दिवशी खरी माहिती दिली असती तर बंगाल ते नागपुर व नागपुर ते चावणी व लोणावळा असा प्रकार करावा लागला नसता.

इतर बातम्या