Breaking news

Lonavala News l लोणावळ्यात सुर सम्राज्ञी आशा भोसले यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम पिया तू ला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद

बातम्यांच्या अपडेट्स साठी what's app ग्रुप जॉईन करा

लोणावळा : सुर सम्राज्ञी आशा भोसले यांच्या गीतांवर आधारित पिया तू या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली.

       लोणावळ्यातील निवडक कलाकार मंगला राणे, डॉ . प्रियांका बच्छाव, रेश्मा गिध, निशा नाइक यांनी आशा भोसले यांची निवडक दर्जेदार गीते सादर केली. यात प्रशांत नाईक व प्रदीप वाडेकर यांनी सह गायकांची भूमिका बजावली तर ऐश्वर्या रजपूत हिने विशेष गीत सादर केले 

अतिशय खुमासदार शैलीत अनुप्रिता यादव ह्यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. प्रत्येक गाण्याला दाद देणारा प्रेक्षक वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.

बातम्यांच्या अपडेट्स साठी what's app ग्रुप जॉईन करा

      लोणावळ्यातील अँड प्रथमेश रजपूत प्रस्तुत व प्रदीप वाडेकर आयोजित आशा भोसले यांच्या गीतांवर आधारित या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मिनी शंकरशेठ, विलासराव शंकरशेठ, ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळज, वत्सला ताई  वाळुंज, धीरूभाई कल्याणजी हे आवर्जून उपस्थित होते. तसेच आधार फाउंडेशन चे अध्यक्ष प्रकाश पाठारे, नामदेव डफळ, जेष्ठ नागरिक संघाचे खजिनदार गोरख चौधरी, संजय गोलपकर, राजेश मेहता, लायन्स क्लब लिजेन्ड चे अध्यक्ष सुरेश गायकवाड, लायन्स क्लब च्या माजी अध्यक्षा विजया खंडेलवाल, डॉ हिरालाल खंडेलवाल, शत्रुघ्न खंडेलवाल, डॉ. जिभाव बच्छाव, जे.बी.सिंग बक्षी, सुनील यादव, राजू दिवेकर, बापुलाल तारे, म्रुदुला पाटील, संध्या गव्हले, रश्मी सिरसकर, सुनील पानगवकर, किरण स्वामी, सविता परदेशी, प्रतीक्षा महाडिक, प्रमोद बन्सल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

      अँड प्रथमेश रजपूत यांच्या वतीने प्रमुख पाहुणे व कलाकारांचा भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला सुनील पानगवकर, रश्मी सिरसकर, नितीन वाळंज, गुरुनाथ नेमाने यांचे विशेष सहकार्य लाभले.

इतर बातम्या