Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळा शहरात शुक्रवारी 24 तासात 42 मिमी पावसाची नोंद

लोणावळा (Lonavala) : लोणावळा शहरात पावसाला पुन्हा सुरुवात (Lonavala City Rain Start) झाली आहे. शुक्रवारी (28 जून) 24 तासात शहरात 42 मिमी (1.65 इंच) पावसाची नोंद झाली आहे. शहरात जोरदार पावसाळा अद्याप सुरुवात झाली असली तरी संततधार पाऊस सुरू झाला आहे. यामधून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गुरुवार व शुक्रवार दोन दिवस पावसाच्या सोबत मोठ्या प्रमाणात वारा देखील येत आहे. या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे व फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. आज शनिवारी देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. लोणावळा शहरात आज अखेरपर्यंत 553 मिमी (21.77 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यत 448 मिमी (17.64 इंच) पाऊस झाला होता.

इतर बातम्या