Breaking news

वलवण नांगरगाव दरम्यानचा पुल वाहतुकीसाठी खुला झाला पण पुलाच्या दोन्ही बाजुला रस्त्यावर खड्डेच खड्डे !

What's app ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

लोणावळा : वलवण नांगरगाव दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या जोड रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डेच खड्डे पडले आहेत. वारंवार मागणी करून देखील संबंधित कामाचे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात चालढकल होत असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना येथून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागणार आहे. 

What's app ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

    सदर पुलाच्या कामासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी वैशिष्टयपूर्ण योजनेतून 1 कोटी 46 लाख 76 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम मंजूर ठेकेदार नोबेल कन्स्ट्रक्शन कंपनी यांना दिले होते. कामासाठी 10 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र लोणावळा शहरातील पावसाचा विचार करता नोव्हेंबर महिन्यात कामाला सुरुवात करत 31 मे पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले होते. 10 जून पासून सदरचा पुल व रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. तेव्हा पुलाच्या बाजूला असलेला भराव वाहने जाऊन दबल्यानंतर त्यावर पुढील आठवड्यात पक्के मटेरियल टाकण्यात येईल असे सांगण्यात आले होते. पावसाने देखील उघडीप दिल्याने हे काम मार्गी लागेल अशी नागरिकांची अपेक्षा होती. पण हे काम आजुन पूर्ण झालेले नसल्याने त्याठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे खड्ड्यांमधील खडी रस्त्यावर पसरत आहे. तसेच खड्ड्यांमध्ये वाहने देखील आदळत आहेत. आजुन देखील लोणावळ्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने नोबेल कन्स्ट्रक्शन कंपनीला सदरचे काम तात्काळ करून घेण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 1 जुलै रोजी होणाऱ्या आमदार सुनील शेळके यांच्या आढावा बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.

इतर बातम्या