Breaking news

अंबरवाडी गणपती मंदिर रोडवर व विजेच्या तारांवर पडलेले झाड बाजूला काढण्यात लोणावळा नगर परिषदेच्या पथकाला यश

What's app ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

लोणावळा : अंबरवाडी गणपती मंदिर रोडवर व विजेच्या तारांवर पडलेले गोळीचे जंगली झाड बाजुला काढण्यात लोणावळा नगर परिषदेच्या पथकाला यश आले आहे. विजेच्या तारांवर हे झाड पडल्याने त्याला बाजुला काढण्यात काहीसा वेळ गेला. सदरचे झाड पडल्याने विजेचा एक खांब देखील तुटला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. स्थानिक नागरिकांनी याबाबत लोणावळा नगर परिषद पथकाला माहिती दिल्यानंतर पथकाने तातडीने घटनास्थळी जात झाड बाजुला करण्याचे काम केले. हे झाड रस्त्यावर पडल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. सुदैवाने ही घटना काल घडली नाही. अंगारकी चतुर्थी निमित्त काल येथील गणपती मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी होती. 

What's app ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

   सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने वाऱ्यामुळे अनेक जुनी झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत. नागरिकांनी देखील पावसापासून बचाव करण्यासाठी झाडांखाली उभे राहताना काळजी घ्यावी असे आवाहन लोणावळा नगर परिषदेने केले आहे. पडलेले झाड पूर्णपणे बाजुला केले असल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

इतर बातम्या