Breaking news

RPTS समोर राष्ट्रीय महामार्गावर पडले गुलमोहराचे झाड; वाहतूक विस्कळित

लोणावळा : कालपासून लोणावळ्यात जोरदार वारे वहात असल्याने या वाऱ्यामुळे पोलीस ट्रेनिंग सेंटर (RPTS) समोर आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एक गुलमोहराचे झाड मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व एमएसईबी च्या तारांवर पडले आहे. यामुळे पुण्याच्या बाजूला येणारी वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. झाड पडल्याची माहिती सकाळी समजताच लोणावळा नगर परिषदेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून राष्ट्रीय महामार्गावर पडलेले झाड सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास बाजूला केले असल्याची माहिती वृक्ष विभागाचे प्रमुख जितेंद्र राऊत यांनी दिली.

इतर बातम्या