Breaking news

Lonavala Free Medical Camp l स्वामीराज जनकल्याण केंद्र नांगरगाव येथे रविवारी 30 जून रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

लोणावळा (Lonavala) : स्वामीराज जनकल्याण केंद्र, नांगरगाव येथे उद्या रविवारी 30 जून रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे (Free Medical Camp) आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान हे शिबीर होणार आहे. 

     या शिबिरात रक्त तपासणी, नाक, कान, घसा तपासणी, स्त्रीरोग तपासणी, सर्जिकल तपासणी, रक्तदाब (ब्लड प्रेशर) व फुफ्फुस तपासणी या सर्व तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडून मोफत करण्यात येणार आहे. तरी लोणावळा शहर व परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिराचे आयोजक श्री स्वामीराज जनकल्याण केंद्र नांगरगाव व कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या