Breaking news

Lonavala News : तुंगार्ली गावातील ओमकार तरुण मंडळाच्या वतीने पोमगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न; शालेय विद्यार्थ्यांसाठी जलशुद्धीकरण मशीन व प्रथमोपचार पेटी भेट

लोणावळा : प्रजासत्ताकदिनानिमित्त तुंगार्ली गावातील ओमकार तरुण मंडळ आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने मुळशी तालुक्यातील पोमगाव याठिकाणी मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 265 ग्रामस्थांची जनरल तपासणी करण्यात आली तर 165 जणांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शिवाय 110 जणांची रक्त व हिमोग्लोबीन तपासणी तर 65 जणांचे बॉडी चेकअप करण्यात आले.

    ओमकार तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी लोणावळा शहराच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी तसेच दुर्गम भागात असलेल्या गावांमधील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी मुळशी तालुक्यातील पोमगाव येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील मुळशी धरण प्रशालेच्या प्रांगणात पार पडलेल्या या शिबिराला तेथील स्थानिक तसेच आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

     लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाचे मानद अध्यक्ष माजी नगरसेवक राजू बच्चे, अध्यक्ष बापुलाल तारे, पोमगावच्या सरपंच रंजना गुरव, उपसरपंच संगिता बोडके, माजी उपसरपंच राजू ओव्हाळ, अरुण ओव्हाळ, शाळेचे मुख्याध्यापक पुंजाराम गांगुर्डे, माजी नगरसेवक सुनील अंभोरे, विशाल पाडाळे,  ओमकार तरुण मंडळाचे सतीश गावडे, जयंत गोसावी, नितीन गायकवाड, प्रकाश लोखंडे, शहाजी अंभोरे, शफीक खलीपा, रघुनाथ मावकर, प्रमोद खिल्लारे, विजय इंगुळकर, किरण येवले, गणेश मावकर, अनंता पाडाळे, बंडा कुटे, विशाल बच्चे, प्रसाद मावकर, ज्ञानेश्वर मावकर, बाळकृष्ण पिंगळे, नंदू पाडाळे, भास्कर देशमुख, दत्ता इंगवले, हरीलाल बोरकर, दादाराव शेरेकर, विजय येवले, सचिन गायकवाड, मयूर बोरकर, संजय उत्तेकर, गणेश शेलार, गोकुळ खैरनार, संजय गुरव, सुनील खिल्लारे, अनिल अंभोरे, धनंजय होणंगी, उमेश गायकवाड, बबन देशमुख, मेहेर कॉन्ट्रॅक्टर, सुनील मावकर, शुभम गावडे, योगेश गोसावी, समर्थ खिल्लारे, प्रकाश धनकवडे, अनिल अकोलकर, सुभाष बालकवडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     या शिबिरासाठी मुंबई येथील डॉ. सतीश वाघ, लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. अर्चना पावडे, स्त्री रोग तज्ञ डॉ. निधी टाटीया, आहार तज्ञ अनुराधा फाले, वेलनेस कोच कमलेश फाले, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे डॉ. अमोल शिंदे तसेच चैतन्य क्लिनिकल लॅबोरेटरी यांनी आपली सेवा दिली. या शिबिरासाठी मंडळाचे किशोर पवार, अशोक साळवे व लोणावळा मेडिकल शॉप असोसिएशनचे राजू खंडेलवाल यांच्याकडून मोफत औषधे पुरवण्यात आली.

     आरोग्य शिबीर संपन्न होत असताना ओमकार तरुण मंडळाच्या माध्यमातून मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या कन्या मिताली व मिथिला पाटील यांनी विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने एक्वागार्ड अर्थात जलशुद्धीकरण मशीन मुळशी धरण प्रशालेला भेट दिली. शिवाय येथील 150 विद्यार्थ्यांना माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक राजू बच्चे यांच्याकडून खाऊचे वाटप करण्यात आले. जयंत गोसावी यांच्या वतीने शाळेसाठी दोन सुसज्ज अशा प्रथमोपचार पेट्या तर बापुलाल तारे यांच्याकडून शालेय ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देण्यात आली. शाळेतील विद्यार्थीनींसाठी सतीश गावडे यांच्या वतीने सॅनिटरी पॅड व नितीन गायकवाड यांच्याकडून रिबीन देण्यात आल्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी विजय येवले व पंढरीनाथ वाडेकर यांच्याकडून टूथपेस्ट, प्रवीण खिल्लारे यांच्याकडून टूथब्रश, अपर्णा गावडे यांच्याकडून डेटॉल साबण आणि ज्ञानेश्वर येवले यांच्याकडून मेडिकल किट भेट स्वरूपात देण्यात आले.

इतर बातम्या