Breaking news

Lonavala | भांगरवाडीत गीत रामायण हा संगीतमय कार्यक्रम संपन्न; नागरिकांची मोठी उपस्थिती

लोणावळा : श्रीराम मंदिर ट्रस्ट भांगरवाडी व वसंत व्याख्यानमाला समिती लोणावळा यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्त भांगरवाडी येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये गीत रामायण या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी सायंकाळी करण्यात आले होते. सुप्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आपल्या अमोघवाणीने गीतरामायणाचे निरूपण केले. तर त्यांना सोबत असलेल्या गायकांनी अतिशय सुमधुर आवाजामध्ये गायन सादर करत साथ दिली. 

      स्वतंत्र पूर्व काळापासून लोणावळा शहरांमध्ये भांगरवाडी या ठिकाणी श्रीराम मंदिर आहे. मंदिराला 123 वर्ष पूर्ण झाले आहेत. या मंदिराचे मागील दीड वर्षापासून जिर्णोद्धाराचे काम सुरू होते. ते काम नुकतेच पूर्ण झाले असून येत्या 26 एप्रिल रोजी मंदिराचा कलश रोहन कार्यक्रम होणार आहे. नुकत्याच झालेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे निमित्त साधत गुरुवारी गीत रामायण या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोणावळा शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित लावत गीत रामायणाचा आनंद घेतला. अनघा मोडक यांच्या अमोघ वानिने उपस्थित श्रोत्यांना आत्मिक समाधान दिले. अतिशय सुंदर पद्धतीने श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. राजेंद्र चतुर्वेदी यांनी गीत रामायण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. कार्यक्रमांमध्ये राम कथांचे गायन नचिकेत देसाई, धनंजय म्हसकर, सृष्टी कुलकर्णी, केतकी भावी जोशी यांनी केले तर त्यांना संगीत साथ संयोजन आणि व्हायोलिन साथ महेश खानोलकर, संवादिनी निरंजन लेले, कीबोर्ड प्रशांत लळीत व सागर साठे, तबला निषेध करलगिकर, पखवाज आणि ताल वाद्य हनुमंत रावडे, ताल वाद्य सूर्यकांत सुर्वे यांनी दिली.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा राधिका भोंडे यांनी केले सूत्रसंचालन ॲड. संजय गायकवाड यांनी केले तर प्रशांत पुराणिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

     

इतर बातम्या