Breaking news

श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुती एकवटली; तुंगार्ली पांगोळी भागात प्रचाराला जोरदार प्रतिसाद

लोणावळा : मावळ लोकसभेचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ( A), रासप, मनसे, एसआरपी या घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळ्यात महायुतीचे सर्व घटक पक्ष एकवटले आहेत. तुंगार्ली, पांगोळी भागात मंगळवारी राबविण्यात आलेल्या प्रचार फेरीला संपूर्ण प्रभागामध्ये जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

      खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा सुरू करण्यात आला आहे. मंगळवार (30 एप्रिल) लोणावळा शहरातील पांगोळी व तुंगार्ली विभागात महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ कार्य अहवालाचे वाटप पांगोळी येथील श्री भैरवनाथ मंदिरात माजी उपनगराध्यक्ष नारायणभाऊ पाळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना घरोघरी जाऊन कार्य अहवालाचे वाटप केले तसेच देशाच्या वाटचालीसाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा एकदा खासदार श्रीरंग बारणे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. महायुतीच्या या प्रचार दौऱ्यामध्ये त्यांची संख्या लक्षणीय आहे सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी युवक कार्यकर्ते व महिला यांची एकजूट या निमित्ताने पहायला मिळत आहे. कार्य अहवालाच्या माध्यमातून खासदार श्रीरंग बारणे यांनी लोणावळा शहर व मावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना दिली जात आहे.

इतर बातम्या