Breaking news

Lonavala Nagarparishad | महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्त लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने मतदाता जनजागृती अभियान

लोणावळा : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने मातदाता जनजागृती अभियान राबवत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच त्यांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली.

     लोणावळा नगरपरिषदे मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांच्या हस्ते लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कामगार पुतळा (मावळ पुतळा) व सर्व राष्ट्र पुरुषाच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. सकाळी आठ वाजता लोणावळा नगरपरिषद कार्यालयाच्या समोर ध्वजावंदन मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाल्यानंतर मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी उपस्थित सर्वांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून लोकशाही सुदृढ करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित सर्वांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. लोणावळा शहरात देखील मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. सोबतच लोणावळा शहरात प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी असल्याने दुकानदार व नागरिकांनी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले. मंगळवारी 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व लोणावळा नगरपरिषद यांना शहरात संयुक्त रित्या फिरत दुकानांची पाहणी केली असता बहुतांश दुकानदार प्लास्टिक पिशव्या वापरत नल्स्याचे दिसून आले. काही दुकानांमधून मिळून 50 कीलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. 

स्वच्छ्ता कर्मचारी सन्मान सोहळा

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्त स्वच्छता कर्मचारी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कर्मचाऱ्यांना मोफत पीपीई किट व उत्कृष्ट काम करणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्वच्छता कर्मचारी हे खर्‍या अर्थाने शहरातील स्वच्छता दूत आहेत. ते दररोज दिवस उजडण्यापूर्वी गावात स्वच्छता करतात म्हणून गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहात आहेत. त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मान देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याच्या भावना यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी व्यक्त केल्या.

इतर बातम्या