Breaking news

नृत्यभारत राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत नादब्रह्म नृत्यालय लोणावळा येथील विद्यार्थ्यांनी दाखवली चमकदार कामगिरी !

मावळ माझा न्युज नेटवर्क : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलामंदीर, पुणे येथे (26 एप्रिल) रोजी आयोजित नृत्यभारत फेस्टिवल असोसिएट विथ इंडियन आर्ट कल्चरल मध्ये नादब्रह्म नृत्यालय लोणावळा येथील विद्यार्थ्यांनी दमदार नृत्य सादर करत बक्षिसांची कमाई केली.     

         स्पर्धेमध्ये नादब्रह्मच्या विद्यार्थीनींनी 

लहान गट (जुनियर) सेमी-क्लासिकल समुह नृत्या मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. एलीना निकम, धृवी,वीरा देशपांडे, श्रावणी पाठारे, श्रुति मुंडे, सुनिक्षा शेट्टी ह्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. लहान गट (जुनियर) सेमी-क्लासिकल सोलो नृत्यामध्ये बिल्वा मोरे प्रथम क्रमांक, श्रुति मुंडे तिसरा क्रमांक, संस्कृति लोणकर उत्तेजणार्थ तर त्याच गटा मध्ये वीरा देशपांडे हिने सोलो क्लासिकल नृत्यामध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे.

लहान गट (जुनियर) लोकनृत्य (फोक डान्स) या मध्ये बिल्वा मोरे द्वितीय क्रमांक तर संस्कृती लोणकर हिने उत्तेजणार्थ बक्षिस पटकावले आहे. मोठा गट सोलो सेमी-क्लासिकल नृत्यामध्ये पूर्वा शिंदे प्रथम क्रमांक ,सहारा वाघमारे प्रथम क्रमांक‌ तर तनिषा शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

       नादब्रह्म नृत्यालयाच्या सर्वे सर्वा गुरु ज्योति उज्जवल भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व विद्यार्थीनी नृत्याचे शिक्षण घेत आहेत. गुरु ज्योति उज्जवल भोळे यांनी सर्व विद्यार्थीनीं चे कौतुक व अभिनंदनही केले.

इतर बातम्या