Breaking news

गवळीवाडा, टाटा कॅम्प, न्यू तुंगार्ली भागात श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कार्य अहवालाचे वाटप

लोणावळा : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (A), रासप, मनसे, एसआरपी या घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा बुधवार (1 मे) मुंबई पुणे हायवे, गवळीवाडा, टाटा कॅम्प, न्यू तुंगार्ली, इंदिरानगर, प्रिचली हिल या विभागात संपन्न झाला. महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ या भागात कार्य अहवाल वाटप शुभारंभ गवळीवाडा येथील श्रीराम मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी गवळीवाडा प्रभागात घरोघरी जाऊन कार्यअहवाल व पत्रकाचे वाटप केले.

इतर बातम्या