Breaking news

Lonavala | लोणावळ्यात 50 किलो प्लास्टिक जप्त; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व लोणावळा नगरपरिषद यांची कारवाई

लोणावळा : प्लास्टिक मुक्त लोणावळा शहर करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, पुणे शाखा व लोणावळा नगरपरिषद यांच्या मार्फत शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी अंतर्गत धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत सुमारे 50 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. मंगळवार (30 एप्रिल) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड व लोणावळा नगरपरिषदेच्या संयुक्त पथकामार्फत शहरातील विविध आस्थापनात जाऊन बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर कुठं होत आहे याबाबत तपासणी करण्यात आली. ज्या ठिकाणी असे बंदी असलेले प्लास्टिक आढळून आले ते प्लास्टिक जप्त करून दंड वसूल करण्यात आला. 

     या मोहिमेत 50 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. यावरून शहरात प्लास्टिक बंदीची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होत असल्याचे मत महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की बंदी असलेले प्लास्टिक दुकानात विक्रीसाठी ठेवू नये तसेच प्लास्टिक मुक्त लोणावळा संकल्पासाठी सर्वांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे.

इतर बातम्या