Breaking news

Lonavala News | हनुमान टेकडी, हुडको, कैलासनगर, पांगारे चाळ भागात मशालीच्या प्रचाराला मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणावळा : मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ लोणावळ्यात महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असून प्रत्येक प्रभागात प्रचाराला नागरिकांचा दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

      याविषयी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाळासाहेब फाटक म्हणाले, मावळ लोकसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराच्या मंगळवारी (30 एप्रिल) सहाव्या दिवसा निमीत्त लोणावळा शहरातील हनुमान टेकडी येथून प्रचाराला सुरूवात करण्यात आली. हुडको, कैलासनगर, पांगारे चाळ येथे प्रचाराचा समारोप करण्यात आला. यावेळी नागरीकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेऊन परीचय पत्रकाचे वाटप करण्यात आले. लोकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला. या प्रचार रॅली मध्ये महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, महिला आघाडी, सेवादलच्या महिला पदाधिकारी व महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी कार्यकर्ते, युवक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या