Breaking news

Maval Loksabha Election | लोणावळा महायुतीच्या वतीने रायवुड ठोंबरेवाडी भागात खासदार श्रीरंग बारणे यांचा घरोघरी जाऊन प्रचार

लोणावळा : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ( A), रासप, मनसे, एसआरपी या घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा मागील पाच दिवसांपासून सुरू आहे. 

    सोमवारी (29 एप्रिल) लोणावळा शहरातील ठोंबरेवाडी, रायवूड, खोंडगेवाडी, वर्धमान सोसायटी विभागात महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्य अहवालाचे वाटप केले. याचा शुभारंभ ठोंबरेवाडी येथील श्री हनुमान मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष विलासभाऊ बडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

      ठोंबरेवाडी, रायवूड, खोंडगेवाडी, वर्धमान सोसायटी भागात घरोघरी जाऊन नागरिकांना कार्य अहवाल देण्यात आला. मागील पाच वर्षात काय कामे करण्यात आली आहेत ते सांगण्यात आले. तसेच यावेळी देखील धनुष्यबाणाला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महायुतीच्या माध्यमातून लोणावळ्यात करण्यात आलेल्या कामांची देखील माहिती देण्यात आली.

इतर बातम्या