Breaking news

वडगाव मध्ये शनिवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा

लोणावळा : मावळ तालुक्याचे ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त व वडगावचे माजी सरपंच सोपानराव बाबुराव म्हाळसकर (आण्णा) यांचे रविवारी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांना मावळ तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी वडगाव या ठिकाणी शनिवारी (27 एप्रिल) सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

       गावाच्या विकासासाठी व तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान च्या धार्मिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या स्मृतींना या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेतून अभिवादन करण्यात येणार आहे. श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगण येथे होणाऱ्या या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेला मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थान, सर्व विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ वडगाव मावळ, अखिल भारतीय वारकरी मंडळ, मावळ तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या