Breaking news

Loksabha Election | कार्ला गावात निवडणूक आयोगाकडून मतदान ओळखपत्र चिट्टी वाटप कार्यक्रम

कार्ला : लोकसभा निवडणूक 2024 हा राष्ट्रीय महोत्सव असून कोणीही मतदाना पासून वंचित राहणार नाही यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने विविध उपक्रम घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कार्ला गावातील मतदारांना घरपोच मतदान ओळखपत्र चिट्टी (व्होटर स्लिप) चे वाटप करण्यात आले आहे. मतदार संघात सर्वत्र ह्या चिठ्ठ्या मतदारांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत.

     येत्या 13 मे रोजी मावळ लोकसभेसाठी मतदान होणार आहे. मतदान करणे हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार असल्याने ज्यांचे वयाची 18 वर्ष पूर्ण झाले आहेत व ज्यांची मतदार यादी मध्ये मतदार म्हणून नोंद झाली आहे अशी कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये त्यांचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे मतदान क्रमांक काय आहे याची माहिती व्हावी याकरीता भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान चिठ्ठी वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.  

       मावळ तहसिल अतंर्गत निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळ तहसिलदार विक्रम देशमुख, नायब तहसिलदार गणेश तळेकर, जयश्री मांडवे, मंडल अधिकारी आशा धायगुडे, तलाठी दिपक धनवडे यांंच्या मार्गदर्शनाखाली   बीएलओ यांच्यामार्फत गावागावात वाड्या वस्त्यामध्ये जाऊन मतदारांच्या मतदार क्रमांक व फोटो असलेले व संपुर्ण नाव व पत्ता असलेली  चिट्टी (व्होटर स्लिप) वाटप काम सुरू करण्यात आले आहे.

  कार्ला येथील बीएलओ उमेश इंगूळकर, विवेक भगत हे कार्ला गावातील मतदारांना मतदान करण्यासाठी जनजागृती करत असून मतदान करण्यास प्रवृत्त करुन मतदान अनुक्रमांकाची चिट्टी वाटप करत आहे. वाटप करत असलेली मतदान चिठ्ठीवर पुढील बाजूस मतदाराचा फोटो, नाव, मतदान केंद्राचे नाव व इंग्रजी व मराठीत माहिती देण्यात आले आहे.



इतर बातम्या