Breaking news

Maval Loksabha 2024 | मावळ तालुका हाताच्या वज्र मुठीत मशाल पेटवत विजयाची तुतारी फुंकण्यासाठी सज्ज - माऊली दाभाडे

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ तालुका येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हाताच्या वज्र मुठीत मशाल पेटवत विजयाची तुतारी फुंकण्यासाठी सज्ज झाला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडे यांनी केले आहे. महाविकास आघाडी (इंडिया) चे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ माऊली दाभाडे यांनी मावळ विधानसभा क्षेत्रात मागील काही दिवसांपासून मेळावे आयोजित केले आहेत. जिल्हा परिषद गट निहाय मतदारांच्या भेटी घेत त्यांनी इंडिया आघाडीला निवडून देणे का गरजेचे आहे हे सांगत आहे. मावळ तालुक्याचा विकास साधायचा असेल तर यावेळी संजोग वाघेरे यांच्याशिवाय पर्याय नाही असे दाभाडे सांगत आहेत. मागील दोन निवडणुकीत मावळ तालुक्याने ज्यांना निवडून दिले त्यांनी काय विकास केला हे सर्वांना माहीत आहे. दहा वर्षात एक सांगता येईल असे काम केले नाही. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता आले नाही, महिलांसाठी काही ठोस करता आले नाही. निसर्ग संपन्न मावळ तालुका असताना येथील पर्यटन विकासासाठी काय केले, मावळात अनेक ठिकाणी वन विभागाच्या अडथळ्यामुळे कामे थांबली आहेत, हा केंद्राशी निगडित विषय असताना तो प्रश्न कधी मांडला नाही. कोणताच प्रश्न सुटलेला नाही, मतदार संघात कधी फिरायचे नाही, मतदारांचे प्रश्न समजून घ्यायचे नाही ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत अशा व्यक्तीला पुन्हा का व कशासाठी निवडून द्यायचे असा प्रश्न या मेळाव्यात मान्यवरांनी उपस्थित केला. मावळातील रखडलेला हा विकास करण्यासाठी यावेळी कोणाच्या हवेवर निवडून येणार नाही तर सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला असलेला, सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिवसरात्र काम करणारा व आपल्या नात्या गोत्यातील असलेला उमेदवार म्हणजेच संजोग वाघेरे यांना निवडून दिल्लीला पाठवायचे आहे. त्यांच्याकडून मावळातील पर्यटनाचे, युवकांचे, शेतकरी व महिलांचे प्रश्न सोडवून घेण्याची जबाबदारी आम्ही व्यासपीठावर बसलेले सर्वजण घेतो असे यावेळी सांगण्यात आले.

      शिव सोनाई गार्डन आंबी येथे हा मेळावा पार पडला. यावेळी मावळ तालुका पुणे जिल्हा सहकारी पत संस्थेचे माजी अध्यक्ष व सहकार महर्षी माऊली दाभाडे, पुणे जिल्हा शिवसेनेचे संघटक माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस निखिल कवीश्वर, राष्ट्रवादी काँग्रेस शारद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, प्रचार प्रमुख व उप जिल्हा प्रमुख भारत ठाकूर, माजी नगराध्यक्ष सुरेश भाऊ चौधरी व पदाधिकारी तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या