Breaking news

मोठी बातमी | सकल मराठा समाजाचा मावळ लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना एकमुखी पाठिंबा

मावळ माझा न्युज नेटवर्क : सकल मराठा समाजाच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला आहे. खोपोली येथे 4 मे रोजी सकाळी पार पडलेल्या बैठकीमध्ये उपस्थित सकल मराठा समजाच्या सर्व समन्वयकांच्या वतीने हा एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण मराठा समाज संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करेल असा विश्वास या बैठकीमध्ये संजोग वाघेरे यांना देण्यात आला आहे. यावेळी बोलताना संजोग वाघेरे यांनी लोकसभेमध्ये पहिला मुद्दा हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मांडला जाईल असे आश्वासन सकल मराठा समाजाला दिले. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सातत्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरला जाईल असा शब्द देखील त्यांनी समाजाला दिला आहे.

    जरांगे पाटीलांनी सकल मराठा समाजाला सांगितले आहे की, लोकसभा निवडणुकीत समाजाची ताकद दाखवा आणि ज्यांनी आपल्या गुलालाचा अपमान केला, ज्यांच्यामुळे माय भगिनींचे रक्त सांडले, SIT लावली त्यांना दणकून पाडा. अशा सूचना दिल्यानंतर, सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक 3 मे रोजी खोपोली येथे झाली. त्या बैठकीत कर्जत, खालापूर, खोपोली, पनवेल, उरण येथील सकल मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते. जवळपास 2 तास बैठक सुरु होती. त्यामध्ये प्रत्येकाने मत मांडताना सांगितले की, जरांगे पाटीलांनी सांगितले आहे लोकसभा निवडणुकीत समाजाची ताकद दाखवा आणि ज्यांनी आपल्या गुलालाचा अपमान केला, माय भगिनींचे रक्त सांडले, SIT लावली त्यांना दणकून पाडा. मग सत्ताधारी उमेदवाराला पाडायचं तर त्याला जो पाडू शकेल त्या उमेदवाराला निवडून दयावे लागेल. मावळ लोकसभेसाठी 33 उमेदवार असेल तरी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघिरे पाटील व महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात थेट लढत होणार असल्याने सकल मराठा समाजाने संजोग वाघेरे पाटील यांनाच मतदान करू, असे सर्वानी एकमताने ठरवले. परंतू वाघिरे पाटीलांची मराठा समाजा संदर्भात भूमिका काय आहे ते जाणून घेण्यासाठी पुन्हा 4 मे रोजी सकाळी 9 वाजता सकल मराठा समाज रायगड (मावळ मतदार संघ) यांची बैठक खोपोली येथे आयोजित करण्यात आली.

        या बैठकीला उमेदवार संजोग वाघिरे पाटील हे आले असता सकल मराठा समाज समनव्यकांनी त्यांना बैठकीत आपली मराठा समाजा संदर्भात भूमिका काय आहे त्यावर विचारणा केली असता, वाघेरे म्हणाले, मी पहिल्यापासून मराठा आंदोलनात एक कार्यकर्ता म्हणून सहभागी आहे. मी निवडून आल्यानंतर संसदेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडेल. आरक्षण साठी सातत्याने प्रयत्न करीन. जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत शांत बसणार नाही. मी नेहमी मराठा समाजा सोबत राहीन असा शब्द त्यांनी मराठा समाजाला दिला. तेव्हा उपस्थित सर्व बांधवानी एकमताने संजोग वाघेरे पाटील यांना एकमुखी पाठिंबा दिला. आता समाज तुम्हाला निवडून आणल्याशिवाय शांत बसणार नाही. मावळ लोकसभा मतदार संघात मनोज जरांगे पाटील मुक्कामी असताना, लाखोंच्या संख्येने मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जमला होता. गावागावातील आई बहिणीनी दिवसरात्र एक करत समाजासाठी भाकरी व चटणी दिली. मात्र हे होत असताना ज्यांना दोन वेळा खासदार केले ते श्रीरंग बारणे समाजाकडे फिरकले देखील नाहीत. मराठा समाजाबाबत त्यांनी एक शब्द देखील काढला नाही. मागील दहा वर्षात ते आपल्या भागात फिरकले देखील नाहीत. वाशी येथे मुख्यमंत्री यांनी समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला, सगेसोयरे अध्यादेश देत समालाजा गुलाल, आंदोलन मोडीत काढले व अधिवेशनात दिलेल्या शब्द फिरवला. अध्यादेशावर चर्चा न करता पूर्वीप्रमाणेच न टिकणारे आरक्षण जाहीर करत समाजाची दिशाभूल केली. अशा समाजाची दिशाभूल करणाऱ्या व करोडोच्या संख्येने असलेला मराठा समाज व माता भगिनी यांचा अपमान करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची ही निवडणूक असल्याने, मावळ लोकसभा मतदार संघात सकल मराठा समाजाने संजोग वाघेरे पाटील यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे.

      या बैठकीला सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. सुनील पाटील, विनोद साबळे, रायगड जिल्हा समन्वयक शंकर थोरवे, गणेश कडू, उमेश महसे, प्रकाश पालकर, अनिल भोसले, मारुती पाटील, धनश्री दिवाणे, किरण हाडप, उत्तम भोईर, जे.पी. पाटील, भानुदास पालकर, सुरेश बोराडे, नितीन मोरे, अविनाश तावडे, दीपक लाड, एकनाथ पिंगळे, राजन सुर्वे, अविनाश तावडे, मनोहर देशमुख यांच्यासह सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

इतर बातम्या