Breaking news

एसआयटी लोणावळा येथे डिजिटल ट्रान्सफॉर्मशन फॉर रूरल अपलिफ्टमेन्ट विषयी राष्ट्रीय परिषद; टेक्निकोनॉकडाऊन 2024 उत्साहात

लोणावळा : कुसगाव (बु.) सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा येथे राष्ट्रीय परिषद-टेक्निकोनॉकडाऊन 2024 संपन्न झाली. (टीकेडी 24) ची थीम डिजिटल ट्रान्सफॉर्मशन फॉर रूरल अपलिफ्टमेन्ट होती.

      टीकेडी 24 च्या उदघाटन प्रसंगी विद्यार्थ्यांच्या संशोधन आणि विकास या गुणांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे असे मत टेक्निकोनॉकडाऊन 2024 परिषेदेचे प्रमुख आणि सिंहगड लोणावळा संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांनी व्यक्त केले. या परिषदेमध्ये सुमारे 50 संशोधन पेपर्स आले होते. त्यापैकी 35 पेपर्स ची निवड अंतिम यादी मध्ये प्रदर्शित करण्यासाठी केली गेली. या कार्यक्रमासाठी 150 विद्यार्थी उपस्थित होते.    

       या परिषदेसाठी आयईटीई पुणे विभाग अध्यक्ष डॉ. वीरेंद्र शेटे आणि डॉ. शशिकांत एस. पाटील आयईईई मुंबई विभाग हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे किनोट स्पीकर डॉ. सुनील कुमार पांडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. या परिषदेचे संयोजक डॉ. ज्ञानेश्वर मंत्री व डॉ. प्रशांत डिके हे होते. तर समन्वयकाचे काम प्रा. मनोज भोसले यांनी पहिले. या कार्यक्रमासाठी टेक्निकल एक्स्पर्ट म्हणून प्रा. विकास रासकर चे सहकार्य लाभले.

        राष्ट्रीय टीकेडी 24 च्या शोधनिबंधाचे सत्र नियोजन हे डॉ. ज्ञानेश्वर मंत्री आणि मनोज भोसले यांनी केले. सत्र प्रमुख म्हणून डॉ. नंदकुमार कुलकर्णी, उपप्राचार्य आणि विभाग प्रमुख एस. आय. टी. एस. पुणे  डॉ. वंदना रोहोकले, डॉ. अब्दुल हमीद अन्सारी, डॉ. दीपक रासकर यांनी काम पहिले. सत्राचे सूत्रसंचालन कु. शुभांनु हिने केले. ही परिषद आयईईई मुंबई विभाग व आयईटीई पुणे विभागाच्या विद्यमानाने आयोजित केली होती. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक आणि कार्यकारी मंडळ यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रशांत डिके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

इतर बातम्या