Breaking news

कामशेत शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचार पत्रकांचे वाटप

कामशेत (प्रतिनिधी) : मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आज कामशेत मच्छिमार्केट, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, पवनानगर रोड या भागात प्रचार दौरा काढण्यात आला होता.

       मावळ तालुका उपाध्यक्ष संतोष राक्षे, शहर अध्यक्ष संतोष वीर, युवक अध्यक्ष सुरज पुरी, ओबीसी सेलचे अध्यक्ष अभिजित शिनगारे, अल्पसंख्यांक सेलचे मोईन खान आणि कार्यकर्ते तसेच शिवसेना पक्ष प्रमुख सतीश इंगवले, गणेश भोकरे, काँग्रेस पक्षाचे नेते रोहिदास वाळुंज, राजू चितोडिया, कमल चितोडिया, बाबू वाघमारे यांच्यासह आजी माजी शहर प्रमुख उपस्थित होते. प्रचारा दरम्यान संजोग वाघेरे यांच्या प्रचार पत्रकाचे वाटप करत मशाल हे निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचवण्यात आले.

इतर बातम्या