Breaking news

दहीवली सामुदायिक विवाह सोहळ्यात पाच जोडपी झाली विवाह बध्द

कार्ला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीन  संस्कारशाळा आश्रम दहिवली कार्ला या ठिकाणी  घेण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात मावळ तालुक्यातील दहा परिवारातील पाच वधू वरांचा शुभविवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

         सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष असून 

सामुदायिक विवाह सोहळ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दुपारी बारा वाजता हळदी समारंभ, दुपारी भोजन व सायंकाळी 5.05  वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला.

     या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या नववधूला सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले, नथनी, पैंजण, जोडवी व मनगटी घड्याळ दिले. तसेच साखरपुड्याची साडी व लग्नाचा शालू, संसार उपयोगी वस्तू देखील आयोजकांकडून देण्यात आले. वधू वरांना साखरपुड्याचा व लग्नाचा पोशाख, मनगटी घड्याळ देखील  देण्यात आले. सोबतच बँड पथक वाजंत्री रथ यांंच्या गजराने वर राज्याची मिरवणूक काढण्यात आली. भोजन व्यवस्था मुरारीलाल शर्मा यांंच्या वतिने करण्यात आली होती.

      यावेळी श्रीरंग बारणे, बापुसाहेब भेगडे, गणेश भेगडे, भाऊसाहेब गुंड, दिपक हुलावळे, संदीप वाघिरे, रविंद्र भेगडे, गणपत भानुसघरे, मिलिंद बोत्रे, बाळासाहेब भानुसघरे, सुरेश गायकवाड, जितेंद्र बोत्रे, निखिल कविश्वर, कैलास गायकवाड, लक्ष्मण बालगुडे, मधुकर पडवळ, बाळासाहेब भानुसघरे, बबनराव माने, सचिन येवले, दत्तात्रय पडवळ, प्रदिप हुलावळे, बाळासाहेब आंबेकर, काळुराम थोरवे, अनिल मालपोटे, विठ्ठल वाघमारे, सुभाष भानुसघरे, बाळासाहेब मावकर, शांताराम मावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

     या विवाहसोहळ्याचे आयोजन सोहळा समितीचे अध्यक्ष अमोल भेगडे, मानद अध्यक्ष सचिन भानुसघरे  कार्याध्यक्ष मनोज येवले,  संस्थापक माजी सभापती शरद हुलावळे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे, चंद्रकांत शेलार, संतोष केदारी, संदीप तिकोणे, सदस्य भाऊसाहेब हुलावळे व सर्व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले होते. प्रस्ताविक शरद हुलावळे,स चिन भानुसघरे व अमोल भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे, संदीप तिकोणे, शंकर पडवळ, मच्छिंद्र केदारी यांनी केले.

इतर बातम्या