Breaking news

खंडाळा येथील पॅम्प्स व्हिला परिसरातून दुचाकी लांबवली; महिला अन् पुरुषावर गुन्हा दाखल

लोणावळा : खंडाळा येथील ‘पॅम्प्स व्हिला’ परिसरातून चावी लावलेली दुचाकी अज्ञात महिला आणि पुरुषाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बलवंत सुतार (वय ३५, रा. कळंबे, पोस्ट सरजापूर, ता. वाई, जि. सातारा) हे बुधवारी (दि. ३० सप्टेंबर २०२६) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील खंडाळा येथील पॅम्प्स व्हिला परिसरामध्ये आले होते. तेथे त्यांनी आपली सुझुकी कंपनीची जिक्सर मोटरसायकल (क्रमांक MH 11 BT 2876) चावी तशीच लावून उभी केली व ते लघुशंकेसाठी गेले.

याच संधीचा फायदा घेत तेथे हजर असलेल्या एका अज्ञात पुरुष आणि महिलेने संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुतार यांच्या संमतीशिवाय सुमारे ३०,००० रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी रमेश सुतार यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर २०२६) रात्री पावणेदहाच्या सुमारास लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला व पुरुषाविरोधात भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार संदीप मानकर हे या चोरीच्या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या