Lonavala News l लोणावळ्यात शटर उघडून १० मोबाईलची चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास
लोणावळा : वलवण येथील ठोंबरे टाईल्स शोरूममध्ये मजुरांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्याने ठोंबरे टाइल्स या शोरूम चे शटर उघडून आत प्रवेश केला आणि झोपलेल्या मजुरांचे तब्बल १० मोबाईल फोन, एकूण ४० हजार रुपये किमतीचे, चोरून नेले.
याप्रकरणी विनय चंद्रकांत गायकवाड (वय ३१, व्यवसाय सेल्स मॅनेजर, रा. रोहीदास वाडा, समतानगर, वलवण, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ३.५० वाजण्याच्या सुमारास वलवण येथील ठोंबरे टाईल्स शोरूममध्ये काही लेबर झोपलेले होते. यावेळी अज्ञात इसमाने शोरूमचे उघडे शटर उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर तेथे झोपलेल्या मजुरांचे मोबाईल फोन चोरून तो पसार झाला.
या घटनेप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचा पुढील तपास पोलीस हवालदार खडके करीत आहेत.





















