Mumbai Pune Expressway Accident l मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर तीन वाहनांचा भीषण अपघात एक जण ठार; दोन जखमी
लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर शनिवारी 26 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात मिसिंग लिंक जवळ झाला. उतारावर तीन वाहने एकमेकांना जोरात धडकल्यामुळे झालेल्या या अपघातामध्ये एका चालकाचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत.
संदीप कोळी (वय 35 राहणार कुंम्भोज कोल्हापूर) असे या अपघातात मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने फेविकॉल सदृश्य केमिकल घेऊन जाणारा आयशर टेम्पो वरील चालक संदीप कोळी याची गाडीवरील नियंत्रण सुटलेले उतारावर तो समोर जाणाऱ्या दुसऱ्या एका टेम्पोला मागून जोरात धडकला. ही धडक एवढी भीषण होते की समोरचा टेम्पो हा त्याच्या पुढे जाणाऱ्या एका ट्रेलरला मागून जोरात धडकला. या अपघातामध्ये केबिनमध्ये अडकल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला तर अन्य चालक हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेम्पो मधील फेविकॉल रस्त्यावर सर्वत्र पसरले तसेच समोरच्या टेम्पो मधील पुठ्ठे हे देखील रस्त्यावर पसरल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातामुळे मुंबई लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
अपघाताची माहिती समजतात बोरघाट महामार्ग पोलीस खोपोली पोलीस व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनांमधील चालकांना बाहेर काढले. घटनास्थळावरील फेविकॉल व अपघातग्रस्त वाहने बाजूला करत तासाभरात रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.





















