दुर्गाष्टमी नवरात्र मंडळ नांगरगाव; खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात रुपाली दुर्गे ठरल्या प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात
लोणावळा : दुर्गाष्टमी नवरात्र उत्सव मंडळ नांगरगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या "खेळ रंगला पैठणीचा" या कार्यक्रमाला महिलांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला. या खेळात रूपाली नरेश दुर्गे (प्रथम), शिवानी अमित नंदू (द्वितीय), सानिका शैलेश ठाकर (तृतीय) यांना मानाच्या पैठण्या देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक सुनिल इंगूळकर, माजी शिक्षण समिती सभापती ब्रिंदा गणात्रा, माजी नगरसेविका जयश्री आहेर, रंजना दुर्गे, आशा खिलारे, वसुंधरा दुर्गे, सुधिर पारिठे, अर्जुन पाठारे, सुभाष डेनकर, प्रदीप थत्ते आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळातर्फे उपस्थित असलेल्या सर्वांना भेटवस्तू व अल्पोहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड मोनाली शेलार ह्यांनी केले. सदर कार्यक्रम मनिषा बंबोरी ह्यांनी मंडळाच्या अध्यक्षा संगिता गुजर, उपाध्यक्षा भारती पवार, संध्या निकाळजे आणि सभासद महिलांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडला.
मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात
नांगराई मंदिरात महाभोंडला संपन्न
नांगरगावचे आराध्यदैवत असलेल्या नांगराई देवीच्या मंदिरासमोर शुक्रवारी महाभोंडला संपन्न झाला. नांगरगाव व परिसरातील महिलांनी भोंडल्यासाठी मोठी उपस्थिती लावली होती. स्थानिक युवतींच्या ग्रुपने यावेळी सुंदर असे भोंडला नृत्याचे सादरीकरण केले. स्थानिक महिलांनी याठिकाणी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.