Breaking news

गुरुकुल विद्यालयात योग दिवस उत्साहात संपन्न

लोणावळा : शहरातील गुरुकुल विद्यालयात १२ आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात व योगासनाची प्रात्यक्षिकेत सादर करत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मंगेश मावकर हे उपस्थित होते. 

        योग प्रात्यक्षिकामध्ये एनसीसी स्काऊट गाईडचे कॅडेट तसेच पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. ताडासन, वृक्षासन, सूर्यनमस्कार, भद्रासन यासारखी अनेक योगाची प्रात्यक्षिके यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केली. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बयाजी खुरंगे यांनी केले. नगरसेवक मंगेश मोकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेचे पर्यवेक्षक श्री सूर्यवंशी सर यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले.

इतर बातम्या