Blood Donation Camp l लोणावळ्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद: ६० युनिट रक्ताचे संकलन; रक्तदात्यांना मिळाले ५ लाखांचे विमा कवच
लोणावळा : 'वर्ल्ड ब्लड डोनर डे' चे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा, हॉटेल रिजेंटा आणि आधार ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, १४ जून २०२६ रोजी हॉटेल रिजेंटा, लोणावळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला परिसरातील नागरिक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन हॉटेल रिजेंटाचे जनरल मॅनेजर श्री. कैलाश माळी, अहमदाबादहून आलेले शाह व संघवी परिवारातील मान्यवर आणि लायन्स क्लबच्या अध्यक्षा लायन कांता ओसवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. हा उपक्रम डॉ. दिलीपजी सुराणा, डॉ. पी. एम. ओसवाल तसेच रॉयल ऑर्किड हॉटेल्स प्रा. लि. चे मालक श्री. राजेशजी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
६० युनिट रक्तदान आणि विमा सुरक्षा
या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत ६० युनिट रक्तदान केले. सामाजिक जबाबदारीचे भान राखत, शिबिरातील सर्व रक्तदात्यांना ५ लाख रुपयांचे एक्सीडेंट विमा संरक्षण देण्यात आले, ज्याचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ लोणावळा- खंडाळाच्या अध्यक्षा लायन कांता ओसवाल, लायन डॉ. पोपट ओसवाल, सचिव लायन निराली नाळेकर, लायन देवेंद्र नाळेकर, खजिनदार लायन अश्विनी कदम, लायन मंगेश कदम, झोन चेअरमन एम.जे.एफ. लायन देवल पारेख, चार्मी पारेख, लायन विरल गाला, लायन दीपाली गाला, लायन डॉ. लीना पॉन, आशीष पॉन, लायन झुबेर शम्सी, लायन अभय राठोड, लायन मनोज लुंकड, लायन प्रफुल लुंकड, लायन प्रकाश जैन, लायन डॉ. दिलीप सुराणा तसेच श्री. नंदकिशोर खंडेलवाल उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हॉटेलचे जनरल मॅनेजर श्री. कैलाश माळी, हॉटेलचे संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि आधार ब्लड बँकेचे श्री. शहापुरकर व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी हा उपक्रम नक्कीच दिलासादायक ठरला असून, लायन्स क्लब आणि हॉटेल रिजेंटाच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






















