Kaivalydham l कैवल्यधाम योग संस्थेमध्ये योग कला महोत्सव साजरा

लोणावळा : लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्था आणि आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या सहयोगाने कैवल्यधाम योग संस्थेमध्ये योगकला महोत्सव 2024 साजरा करण्यात आला. सदरचा योग कला महोत्सव सात्विक पाककला स्पर्धा व योगिक नृत्य स्पर्धा या दोन प्रकरात मध्ये साजरा करण्यात आला. सात्विक पाककला स्पर्धेमध्ये आरती शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर योग्य नृत्य स्पर्धेमध्ये रियल रॉकर्स ग्रुप हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. "पाककला स्पर्धा" ही खुल्या वर्गात घेण्यात आली तर नृत्यकला स्पर्धा ही पंधरा वर्षाखालील गट व पंधरा वर्षांवरील गट अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात शांतीपाठाने करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रमुख पाहुण्या लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती सुरेखा जाधव यांच्या शुभहस्ते तसेच कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, कैवल्य विद्या निकेतन शाळेचे संचालक एन.डी. जोशी व प्राचार्या श्रीमती भारती कावडे तसेच कैवल्यधाम कोर कमिटीचे सदस्य निशांत जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करून योगकला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
कैवल्य विदया निकेतन, कैवल्यधाम, लोणावळा शाळेच्या प्राचार्या श्रीमती भारती कावडे यांनी स्वागतपर भाषण केले. कैवल्यधाम कोर कमिटीचे सदस्य निशांत जैन यांनी माजी नगराध्यक्षा यांचा शाल आणि योग प्रतिमा देऊन सत्कार केला. तसेच कैवल्य विद्या निकेतन शाळेच्या प्राचार्या श्रीमती भारती कावडे यांनी कैवल्यधाम संस्थेच्या निसर्गोपचार विभागाच्या डॉक्टर व "सात्विक आहार" पुस्तकाच्या लेखिका रितु प्रसाद यांना सन्मानित केले. यानंतर 15 वर्षाखालील आणि 15 वर्षाखालील स्पर्धकांचे नृत्य सादरीकरण झाले. श्रीमती सुरेखा जाधव यांनी स्पर्धकांचे कौतुक केले आणि कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या. निरोगी जीवन जगण्यासाठी योगसनांसह सात्विक आहार ही देखील काळाची गरज झाली असल्याचे श्रीमती जाधव यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व पारितोषिक देत सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धामधील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे :
पाक कला : आरती शिंदे (प्रथम), नीलम गुरव (द्वितीय), उर्मिला शर्मा (तृतीय)
नृत्य कला : रियल रॉकर्स ग्रुप (प्रथम), इंद्रायणी स्पोर्ट्स ॲकेडमी (द्वितीय), डीवाईन लाइफ ग्रुप (उत्तेजनार्थ)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका डिम्पल प्रधान यांनी केले आणि आभार प्रदर्शन निकिता बुध्दीसागर यांनी केले. शांती पाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.