Breaking news

नांगरगाव भांगरवाडी गौरी सजावट स्पर्धेमध्ये वसुधा येवले प्रथम क्रमांकाच्या मानकरी

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

लोणावळा : गणेश उत्सवा दरम्यान नांगरगाव भांगरवाडी परिसरामध्ये घेण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्धेमध्ये वसुधा येवले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दुर्गाष्टमी नवरात्र उत्सव मंडळ व शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रदीप थत्ते यांच्या वतीने ह्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच नवरात्र उत्सवात पार पडला. प्रथम क्रमांक पाच हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये, तृतीय क्रमांक दोन हजार रुपये व उत्तेजनार्थ 10 बक्षिसे प्रत्येकी 500 रुपये अशी बक्षिसे यावेळी देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अँड. मोनाली कुलकर्णी, अंबिका गायकवाड, रुपाली न्हाल्वे यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील विजेत्या महिला : वसुधा राम येवले (प्रथम क्रमांक), शीला राजू ठाकर (द्वितीय क्रमांक), शोभा सुतार (तृतीय क्रमांक). उत्तेजनार्थ क्रमांक :- पूजा अनूप खिलारे, सुनीता सुनील दाभाडे (भांगरवाडी), आरती शिंदे, अरुणा बाळकृष्ण बलकवडे, जयश्री अनिल भांगरे, पौर्णिमा नाणेकर, सायली सारंग जोशी (भांगरवाडी), नेत्रा हेमंत घारे, वर्षा वसंत भांगरे, आशा अनिल येवले.       

इतर बातम्या