मोठी बातमी । उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा ठरला टर्निंग पाॅईट; शिंदे सरकार तरलं

मावळ माझा न्युज : भावनिक होऊन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा आजच्या निकालातील टर्निंग पाॅईट ठरला असून त्यामुळे शिंदे सरकार तरले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल देताना शिंदे सरकार, राज्यपाल व भाजपा यांना फटकारले, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली, राज्यपालांनी घेतलेले निर्णय यावर ताशेरे ओढले यामुळे हा निकाल ठाकरे गटाच्या बाजुने लागण्याची शक्यता निर्माण झालेली असताना उद्धव ठाकरे यांचा राजीनामा या निकालाचा टर्निंग पाॅईट ठरला. ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार पुन्हा आणता आलं असतं असं म्हत्वपुर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. यामुळे सर्वच प्रक्रिया चुकीची दिसत असली तरी शिंदे सरकारला दिलासा मिळाला असून तेच आता कायम राहणार आहे. 16 सदस्यांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आला आहे मात्र त्याला निश्चित कालावधी न दिल्याने तो निर्णय अध्यक्ष त्यांच्या सोयीने घेऊ शकतात. ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने नविन सरकार स्थापन करण्याला कायदेशीर अडचण नव्हती असेही निकालात म्हंटले आहे.