Breaking news

मोठी बातमी l कुसगाव भैरवनाथनगर परिसरात दोन घरफोड्या; 6 लाखांचा मुद्देमाल लंपास

लोणावळा : कुसगाव भैरवनाथनगर परिसरात शुक्रवारी (24 मे) रात्री व 22 ते 25 मे दरम्यान झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये तब्बल अडीच लाखांची रोकड व सोन्याचा ऐवज असा मिळून 6 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. 

    याप्रकरणी दत्तात्रय शंकर गरवड (वय 40, रा. आयप्पा मंदिराशेजारी, भैरवनाथ नगर कुसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      दत्तात्रय गरवड हे 24 मे रोजी कुटुंबासह पांगोळी येथील फार्म हाऊस वर गेले असताना, त्यांच्या बंद घराचा सेफ्टी दरवाज्याचा कडी कोयंडा तोडत घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी घरातील लाकडी कपाटातील दोन लाख रुपये रोख रक्कम व 3 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. तसेच त्यांच्या घराजवळ असलेल्या के. के. मार्केट शेजारील गोविंद अपार्टमेंट मधील मच्छिंद्र सुर्वे यांच्या तळमजल्यावरील घराच्या सेफ्टी दरवाज्याचा कोयंडा तोडत घरात प्रवेश करत त्यांच्या घरातील 50 हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असे 1 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. 

   लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात या दोन्ही घटनांचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक भारत भोसले घटनेचा तपास करत आहेत.

इतर बातम्या