Breaking news

तळेगाव दाभाडे हिट अँड रन प्रकरण l तळेगाव CO ना पोलिसांनी घेतले ताब्यात, दोन गाड्यांना धडक देऊन केले होते पलायन

तळेगाव दाभाडे : Talegoan Dhabhade Car Accident पुण्यातील हिट अँड रन चे प्रकरण ताजे असताना आता मावळ तालुक्यातील तळेगाव स्टेशन या भागात देखील शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हिट अँड रन चा प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये खुद्द तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी (CO) यांच्या स्कॉर्पिओ गाडीने भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन वाहनांना धडक दिली आहे. सुदैवाने या वाहनांमध्ये कोणीही नसल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही तसेच कोणी जखमी देखील झालेले नाही. मात्र या घटनेमध्ये स्कॉर्पिओसह उभ्या असलेल्या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर घटनास्थळावर न थांबता तळेगाव सिओ यांची स्कॉर्पिओ गाडी घटनास्थळावरून भरधाव वेगाने निघून गेली. काका हलवाई या दुकानाच्या समोर झालेल्या या अपघातानंतर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना तळेगाव पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. काही प्रत्यक्ष दर्शनी पाटील हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे म्हटले असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.

      तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव स्टेशन ते तळेगाव दरम्यान असलेल्या रस्त्यावर काका हलवाई या दुकानासमोर दोन चार चाकी वाहने उभी होती. या वाहनांना भरधाव वेगातील लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक (MH 13 EC 9633) हिने जोरदार धडक दिली. यामध्ये एक पोलो कार (MH 14 CX 3660) व ब्रिझा कार (MH 14 GS 2404) यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलो कारचे मालक सिध्दाराम इराप्पा लोणीकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची फिर्याद दिली आहे. ही धडक दिल्यानंतर मुख्याधिकारी पाटील यांनी घटनास्थळावर न थांबता त्या ठिकाणाहून गाडी वेगात पळवत पळून गेले असे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले आहे. मुख्याधिकारी पदावर बसणारा क्लास वन अधिकारी अशा पद्धतीने वाहने चालवत वाहणाना धडका देत पळून जात असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाचा आदर्श घ्यावा पुणे येथील प्रकरण देशभर गाजत असताना देखील नशा करून वाहन चालवणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे खंत जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अपघाताची घटना समजल्यानंतर तळेगाव पोलिसांनी घटनास्थळावर पाहणे करून प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या वर्णनावरून स्कॉर्पिओ गाडीचा शोध घेतला असता सदरची गाडी मुख्याधिकारी पाटील राहत असलेल्या इमारतीच्या खाली मिळून आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार यांच्या पथकाने पाटील यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. या घटनेचा अधिकचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

इतर बातम्या