Breaking news

MD Drugs l लोणावळा व कामशेत मध्ये पकडले एमडी ड्रग्ज; चार जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा (Lonavala) : मावळ तालुक्यातील युवा पिढी व्यसनाच्या अधीन जाऊ लागली आहे. लोणावळा व मावळात एमडी (MD Drugs) नावाची ड्रग्ज पावडर विकली जात असल्याची माहिती लोणावळा पोलिसांना मिळाल्यानंतर गत दोन दिवसात लोणावळा शहर व कामशेत शहरात लोणावळा उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाया करत 3 लाख 60 हजार रुपयांची (36.60 ग्रॅम) एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणावळ्यातील दोन पेडलर व कामशेत येथील दोन पेडलर यांच्यावर गुन्हा दखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. तपासात यामागे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता सत्यसाई कार्तिक यांनी व्यक्त केली आहे.

मावळ माझा न्युज व्हॉटसअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा

      मावळ तालुक्यात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती श्री कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी सत्यासाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अंमली पदार्थांचे सेवन, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत.

        दिनांक 09/06/2024 रोजी सत्यसाई कार्तीक यांनी त्यांचे पथकासह टाकलेल्या छाप्यात कामशेत पो.स्टे हद्दीतील गगन न्यू लाईफ सोसायटी समोर, रमेश शिंदे यांचे चाळीत दिनेश दीपक शिंदे (वय 24 वर्ष, राहणार कामशेत, तालुका मावळ) व सौरभ राजेश शिनगारे (वय 24 वर्ष, राहणार कामशेत, तालुका मावळ) यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्यांची झाडाझडती घेतली असता त्या दोघांचे ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे एकूण 32 ग्रॅम एमडी पावडर हा अंमलीपदार्थ व त्याची पॅकिंग करून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकींगच्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण 3 लाख 20 हजार 146 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मावळ माझा न्युज व्हॉटसअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा

     पोलीस काॅन्स्टेबल अमोल ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे विविध कलमान्वये कामशेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद कण्यात आला आहे. याचा तपास कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत. 

        16/06/2024 रोजी श्री कार्तिक यांना लोणावळ्यात एमडी ड्रग्ज विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रविवारी  सकाळी 06.20 वाजता रायवुड ते कुरवंडे रोडवर ड्रीमलॅन्ड हाॅटेल समोर शिवाजी मारुती कडू (वय 35 वर्ष, राहणार कुरवंडे,  तालुका मावळ) व दिलीप बबन पिंगळे (वय 29 वर्षे, राहणार कुनेगाव, तालुका मावळ) यांना चारचाकी गाडीतून लोणावळ्याकडे जात असताना ताब्यात घेऊन झडती घेतली असता. त्यांच्याकडे 44000 हजार रुपये किंमतीचे 04.40 ग्रॅम एमडी पावडर मिळून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड हे करत आहेत. 

मावळ माझा न्युज व्हॉटसअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा

       संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या सदरच्या दोन्ही कारवायांमध्ये सुमारे 3 लाख 60 हजार किंमतीची एकूण 36.60 ग्रॅम एमडी पावडरसह रू.12 लाख 14 हजार 146 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या कारवाया पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ अमोल ननवरे, पो.कॉ अंकुश पवार, पो.कॉ गणेश ठाकूर, पो.कॉ प्रतीक काळे , पो.कॉ महेश थोरात, पो.कॉ सौरभ साबळे, पो.कॉ यश माळवे यांचे पथकाने केली आहे.

इतर बातम्या