Breaking news

कान्हे फाटा येथे मटका अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; एक लाखाचा मुद्देमाल जप्त - 7 जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने आज शुक्रवारी (7 जून) रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील कान्हे फाटा येथे मटका अड्ड्यावर धडक कारवाई करत रोख रक्कमेसह 92 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

      आयपीएस कार्तिक यांना कान्हे फाटा येथे अवैधरित्या मटका अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने आज कान्हे फाटा रेल्वे स्टेशन जवळ छापा मारत सदरची कारवाई केली.

     आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, याठिकाणी काळूराम पांडुरंग लालगुडे, कृष्णा धारोबा जाधव, किसन जवेरी कोळी, विलास सोपान बोरडे, किरण विजय यादव, राकेश जेकुप्रसाद यादव हे कल्याण नावाचा मटका खेळताना मिळून आले असून त्यांचेकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा मटका अड्डा हा मदन वाजे चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सहा जणांकडून रोख रक्कमेसह एकूण 92 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

     याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार अंकुश नायकुडे, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कवडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे व वडगाव मावळ पो. स्टे कडील पोलीस पथकाने केली आहे.

इतर बातम्या