Breaking news

Lonavala News l लोणावळा शहरात गुटखा विक्री करणाऱ्या 14 पान टपरी धारकांवर लोणावळा पोलिसांचा कारवाईचा बडगा

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये गुटखा विक्री करणाऱ्या तब्बल 14 पान टपरी धारकांवर लोणावळा पोलिसांनी गुरुवारी धडक कारवाई केली. यामध्ये तब्बल 1 लाख 8 हजार 772 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

      आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना लोणावळा शहरांमधील विविध टप्प्यांमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला विक्री होत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या कार्यालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त टीम तयार करत वेगवेगळ्या टप्प्यांवर धाडी टाकत ही कारवाई करण्यात आली आहे.

      या कारवाईत रवि शंकर बुगडे (दिलखुश पान शॉप), अतुल बळीराम लोखंडे (रुद्रांश पान शॉप), कृष्णा संदीप गवळी (कृष्णा पान शॉप), शोयब नईम खान (श्रीराम पान शॉप), मनोजकुमार महावीर प्रसाद भारव्दाज (कुणाल पान शॉप), उमर मोहमद एम.बी. (इन्टरवल पान शॉप), मोहम्मद एकलास खान (केजीएन पान शॉप), संजय कान्हु सोनवणे (संजय पान शॉप), अशोक गुंडू पुजारी (गणेश पान शॉप), शकील अख्तर रईससुद्दीन शेख (एकविरा पान शॉप), मोहम्मद हसिब शरीफ मन्सुरी (श्री स्वामी समर्थ पान शॉप), यासीन मोहम्मद अब्दुल रेहमान (बिग 5 पान शॉप), अब्दुल रहिमान इब्राहिम (रॉयल पान शॉप), वसुद्दीन सिराजउ‌द्दीन खान (वसीम पान शॉप) यांच्या कडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला वेगवेगळ्या कंपन्यांचा सुगंधीत तंबाखुजन्य गुटखा, पानमसाला असा एकूण 1 लाख 8 हजार 772 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

        सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएएस सत्यसाई कार्तिक यांच्या कार्यालयातील पथक व लोणावळा शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी कर्मचारी पथक यांनी केली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील अधिकचा तपास करत आहेत.

इतर बातम्या