Breaking news

Lonavala News : पर्यटकांच्या गर्दीने लोणावळा हाउसफुल; राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूककोंडी

लोणावळा : शनिवार रविवारच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळा खंडाळा शहरांना पर्यटकांची पसंती मिळत असल्याने लोणावळा हाउसफुल झाला आहे दुपारचे काही तास वगळता सकाळ व संध्याकाळी लोणावळ्यातील वातावरण थंड असल्याने या थंड हवेचा आनंद घेण्यासाठी मुंबई भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत पर्यटकांच्या या गर्दीमुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून खंडाळा घाटात देखील वाहतूक कोंडी झाली आहे पर्यटकांच्या गर्दीने खंडाळ्यातील राजमाची गार्डन खंडाळा बोटिंग क्लब तुंगार्ली धरण पवना धरणाचा परिसर लायन्स पॉईंट कारला लेणी लोहगड किल्ला हे परिसर फुलले आहेत. खरंतर ही सर्व ठिकाणी पावसाळी पर्यटनाची मध्यवर्ती केंद्र आहे मात्र सध्या राज्यभर जाणवत असलेला तीव्र उखाडा यामुळे नागरिक हैराण झाले असून थंड हवेच्या ठिकाणी दोन दिवस जाऊन आराम करावा या भावनेतून पर्यटक लोणावळा माथेरान व महाबळेश्वर या ठिकाणांना पसंती देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोणावळ्यातील हॉटेल्स बंगलोज व खाजगी फार्म हाऊस फुल झाले असून चिक्की खरेदीला पर्यटक पसंती देत आहेत.

इतर बातम्या